Sunday, 20 May 2012

राजा-राणीची कहाणी ...

राम म्हणाला हळूच सीतेला
तुझा निरोप घ्यायला आलो मी
आजपासून या क्षणानंतर
बदलणार राजा-राणीची कहाणी

सीता दचकून म्हणाली रामाला
असे काय झाले सांगा तरी मला
सुखाच्या ह्या सुंदर क्षणी
बोचले कुठल्या काट्याने आपल्याला

आपला म्हणू नकोस ग राणी
हा माझ्या  कर्माचा भाग आहे
तुला गुंतवणार नाही ह्यात मी
हा माझा सदा ध्यास आहे

तुमचे आणि माझे मार्ग एक आहेत
आपला रस्ता काही वेगळा नसे
तुम्हीच समजवा आता मला
कर्म मग आपले वेगळे कसे?

हे राणी, नको ग छळूस मला
शब्दांचे असे जाळे रचुनी
तुझ्या या प्रश्नांची उत्तरे
देऊ नाही शकत सत्य जाणूनी

पण उत्तर द्यावे प्रश्नांचे
असे वाटले तरी का तुम्हाला
तुम्ही असाल तिथेच मी ही असेन
हेच सांगायचे होते मला

माझी वाट खडतर आणि कठीण
मोठ्या परिश्रमांनी भरलेली
तू हे सगळे का ओढुनी घेतेस
तुझ्या भाग्यात जी नाही लिहिलेली

दुरावा का असा आणिता मध्ये?
तुझे अन माझे भाग्य म्हणुनी
आपण दोघे नाही, एक आहोत
का बरे जाता तुम्ही विसरुनी?

कसे समजाऊ मी तुला?
मी राजा तर काय रंक पण नाही राहिलो
या महालाचा अधिकार सोडूनी
मी वनवासी जाण्यास तयार झालो

तुम्ही वनात न्याल तरीही
येईन खुशाल मी तुमच्या संगती
तुमची साथ असेल मला जिथे
तिथेच सुखे भरभरून वाहती

धन्य धन्य असो तुझी सीते
मी काय बोलू तुझ्या वाचानांपुढे
माझीच हार अन माझीच जीत
विचित्र असे रचीलेस हे कोडे

महालात नसलो जरी आपण दोघे
तरी तुम्हीच माझे राजे आणि मी तुमची राणी
जग आणि वेळ बदलली म्हणून काय झाले
नाही बदलणार ही राजा-राणीची कहाणी




So, I guess am back after a hiatus.

Tried something different for a change. A touch of mythology and my own imagination at work. This was written sometime back during the Navratri festival - the one which ends with Ram Navami. A touch of emotion and a play of words. A bit of my own understanding and inferences.

Had shared it earlier with my pals and they loved it. So sharing it with the world now :-). Your views, comments and feedback are all welcome :-)